Home नागपूर मनसे सरचिटणीस गडकरी यांच्या त्रासाला कंटाळून राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीत?

मनसे सरचिटणीस गडकरी यांच्या त्रासाला कंटाळून राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीत?

पक्षाने दिलेले नाव प्रतिष्ठा विसरून अतुल वांदिलेने केली पक्षासोबत गद्दारी?

विशेष बातमी :-

विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेत्रूत्व म्हणून ज्यांच्याकडे पहिल्या जायचे व पक्षाचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या जे सोबत सावली सारखे राहायचे ते मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांचा अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतं असल्याची बातमी ऐकून महाराष्ट्र सैनीकाना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा राष्ट्रवादीत होणारा पक्ष प्रवेश हा सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या त्रासामुळे तर झाला नसावा? अशी शंका येत असून साधा पक्षाच्या बैनेर वर फोटो जरी टाकला नाही तरी कुठल्याही पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढणारे व अतुल वांदिले यांच्या पैशानेच मुंबई वाऱ्या करणारे हेमंत गडकरी यांच्या एकाधिकारशाही धोरणामुळे पूर्व विदर्भातील मनसे पदाधिकारी अस्वस्थ असून त्यांच्या माध्यमातून काही मोजक्या वसुलीबाज पदाधिकाऱ्यांना बळ मिळत मिळत आहे, त्यामुळे पूर्व विदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधे नैराश्य पसरले आहे. दरम्यान पक्षाने जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष व आता नुकतच राज्य उपाध्यक्ष पद दिल्यानंतर अतुल वांदिले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी पक्षात जातो म्हणजे ते पक्षाशी गद्दारी करताहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र सैनिकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी अशी सामाजिक माध्यमांवर चर्चा होतं आहे.

आपला पर्याय तयार होऊ देत नाही गडकरी ?

खरं तर नागपूर मधे मनसेला प्रवीण बरडे, किशोर साराईकर, महेश जोशी सारखे अनेक पर्याय उभे होऊ शकतात पण हेमंत गडकरी यांच्या चाणक्य नितीने ते त्यांची मुंबई स्थरावर चालू देत नाही नव्हे बनवाबनवी करून त्यांचा पत्ता कट करतात व पक्षाची सूत्रे आपल्याच हातात रहायला हवी म्हणून पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करतात त्यामुळे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर मधे एक नगरसेवक सुद्धा ते निवडून आणू शकत नाही याकडे राजसाहेब ठाकरे यांनी स्वतःलक्ष घालणे गरजेचे आहे.

पूर्व विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी हेमंत गडकरी यांच्यावर विश्वास टाकला व पूर्व विदर्भ संघटक,, राज्य उपाध्यक्ष ते सरळ पक्षाचे सरचिटणीस पद दिले पण मोबदल्यात पक्ष संघटनेला काय फायदा झाला? तर शून्य.उलट राजसाहेब ठाकरे यांच्या उत्तुंग नेत्रूत्वात काम करण्याची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्याना गटातटात विभागणी करून स्वताचे महत्व वाढून घेण्याच्या नादात पक्षाचे  गुणवंत पदाधिकारी कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले व दुसऱ्या पक्षात लोकप्रतिनिधी बनले, त्यामुळे पक्षाचे सरचिटणीस हेमंत गडकरी पूर्व विदर्भात पक्षाला एक श्राप ठरत आहे.

पूर्व विदर्भात मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी त्यांच्याकडून पक्ष बांधणीची अपेक्षा तर नाहीच उलट त्यांच्या सोबत असलेली मंडळी  ही आपला परिसर सोडून जिल्हाभरातील कंपन्यात आंदोलनाच्या नांवावर वसुली करताहेत व फेसबुक व्हाट्सअपवरच पक्षाचे कार्यक्रम दाखवत आहे.केवळ पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या समोर फुटकळ कामाचा लेखाजोखा किंव्हा चमकोगीरी करणारा अम्बुलँस लोकार्पनाचा ( त्यातही अम्बुलँस दुसऱ्याची आणि फोटो आणि नाव पदाधिकाऱ्यांचे) सोहळा करायचा हा विदर्भात नित्याचाच कार्यक्रम आहे, पण प्रत्यक्षात पक्ष संघटना वाढवून पक्षाची आपापल्या क्षेत्रात राजकीय ताकत निर्माण करण्याचे महत्वपूर्ण काम मनसे पदाधिकारी काही क्षेत्र वगळता करतांना दिसत नाही.पण त्यांना पद मात्र मोठे पाहिजे अशी अनेक मंडळी आहे ज्याना पक्षाशी काहीही घेणे देणे नाही फक्त पक्षाचे पद पैसा कमाविन्यासाठी त्यांना हवे मग पक्ष गेला उडत.अशा अनेकांचा लेखाजोखा जोपर्यंत राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत जात नाही तोपर्यंत पक्षातील चमकोगीरी करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा असली चेहरा समोर येणार नाही.

अतुल वांदिले यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून कुणी केली शिफारस ?

अतुल वांदिले हे वर्धा जिल्हा अध्यक्ष पदी आरूढ असताना पक्षाचे सरचिटणीस हेमंत गडकरी हे त्यांच्या सोबत सावली सारखे राहायचे व त्यांनीच राज्य उपाध्यक्ष म्हणून अतुल वांदिले यांचे नाव समोर केले होते व काही महिन्यापूर्वीच म्हणजे सप्टेंबर 2021 ला राजसाहेब ठाकरे यांनी अतुल वांदिले यांच्याकडे राज्य उपाध्यक्ष हे पद दिले होते, पण पदासोबत प्रतिष्ठा मिळाली की डोक्यात हवा जाते तशी अतुल वांदिले यांची अवस्था झाली असावी व म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा विचार केला असावा अशी शक्यता दिसत आहे.

राष्ट्रवादी चा इतिहास फोडाफोडिचा ?

आपल्या घरी अपत्य झालं नाही तर दुसऱ्यांची मुल आपल्या घरी खेळवण्याचा जुना धंदा राष्ट्रवादी काँग्रेस चा आहे त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी उभी राहिली ती कार्यकर्त्यातून नव्हे तर प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या फोडाफोडिने उभी राहिली आहे. नुकत्याच मनसेच्या रुपाली ठोंबरे असो की मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नीला उमेदवारी चे आमिष देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेण्याचे काम असो. राष्ट्रवादी पक्षात कार्यकर्त्याचा वनवा आहे मात्र प्रस्थापित नेत्यांच्या माध्यमातून पैशाच्या बळावर वेळेवर कार्यकर्ते उभे करून राष्ट्रवादी चे घड्याळ चालत आहे.

.

Previous articleक्राईम ब्लास्ट:- गोल्डमॅन सचिन शिंदे याच्या खून प्रकरणातील एका आरोपीचा खून.
Next articleसनसनी:- राजूर कोल रेल्वे सायडिंग का कोयला विकास कोल ट्रान्सपोर्टसे कोयला व्यापारी के प्लॉट मे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here