Home वरोरा दुर्दैवी :- सेल्फीच्या नादात चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यू.

दुर्दैवी :- सेल्फीच्या नादात चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यू.

हार्दिक विनायक गुळघाणे हय़ा मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात आयुष चीडे यांचा पण बुडून मृत्यू.

शेगाव बू… मनोज गाठले ...

स्थानिक शेगाव येथुन जवळच असलेल्या चारगाव धरण येथे आज दुपारला तीन वाजताच्या दरम्यान दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना उघडकीस आली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाहेर गावी शिकत असलेल्या दोन मित्रांनी आज पोळ्या निमित्याने कॉलेज ला सुट्ट्या लागल्या असल्याने एन्जॉय म्हणून फिरण्याचा बेत आखून सर्व मित्र एकत्र आले व चारगाव धरण येथे जाण्याचा विचार करून तिथे पोहचले सदर धरणाचे मनमोहक दृश्य पाहून सगळ्यांनी फोटो काढण्यात सुरुवात केली तेव्हा मृतक हार्दिक विनायक गुळघाणे राहणार शेगाव बू.हा सेल्फी फोटो काढण्या करिता गेला असता पाय स्लीप होऊन पाण्यात पडला. तेव्हा मृतक आयुष चीडे राहणार वरोरा हा त्याला वाचविण्या करिता गेला असता तो सुद्धा पाण्यात पडला दरम्यान खोल पाण्यात बुडून या दोघाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हार्दिक विनायक गुळघाने वय १९ वर्ष राहणार शेगाव बू. तर दुसरा आयुष चिडे याचा खोल पाण्यात बुडाल्याने जागीच मृत्यू झाला. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मुलांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याकरिता गावातील रामकृष्ण भट यांच्या सहकार्याने नाव्ह व लोखंडी गळाच्या साह्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले …सदर मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदन करण्या करिता उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले . याचा अधिक तपास ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पोलीस कर्मचारी तपास करीत आहे .

मृत युवक सोबत त्यांचे सवंगडी श्वेतम जयस्वाल राह.शेगाव बू. मयूर पारखी राह.वरोरा. आश्रय गोळगोंडे राह.वरोरा.हे मित्र तलाव बाहेर असल्याने त्यांचे प्राण वाचले.या घटनेने सेल्फीचा नाद कसा खुळा आहेत हे समोर आले असून अशा प्रकारचे स्टंट कुणीही करू नये हेच या घटनेने दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here