Home वरोरा अभिनंदनीय कार्य :- मनसे शाखा सालोरी पदाधिकारी व कार्यकर्त्यानी स्वखर्चाने केली जंतुनाशक...

अभिनंदनीय कार्य :- मनसे शाखा सालोरी पदाधिकारी व कार्यकर्त्यानी स्वखर्चाने केली जंतुनाशक फवारणी.

ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावात पसरले होते साथीचे रोग.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असलेले सालोरी हे गाव राजकीय द्रुष्टीने फार महत्वाचे असले तरी येथील सरपंचाचा व सचिवांचा कारभार जनतेच्या जीवावर उठला असल्याचे चिन्ह निर्माण झाले होते. ऐन पावसाळ्याच्या दिवसात तब्बल दोन महिने या गावातील स्ट्रीट लाईट ग्रामपंचायतने वीज बिल भरले नाही म्हणून बंद होते तर दुसरीकडे गावातील रस्ते नाल्यांची दुर्दशा व रात्रीच्या अंधारात अपघात होण्याची भीती असल्याने मनसे पदाधिकारी व शाखा पदाधिकारी यांनी या संदर्भात संबंधित प्रशासन यांच्याकडे तक्रारी करून सालोरी गावातील ज्वलंत समस्या सोडविण्याचा तगादा लावला दरम्यान स्थिती फार बिघडली असल्याने अगोदर स्ट्रीट लाईट सुरू व्हावे याकरिता महावितरण कंपनी कडे वारंवार पायपीट केली व सतत पावसामुळे अंधारात कुणावर आकस्मिक संकट येऊ नये म्हणून मनसे शाखा पदाधिकाऱ्यांनी गावात जनजाग्रुती करिता उपक्रम हाती घेऊन रैलीचे आयोजन केले. आणि आता पाऊस थांबला असला तरी जागोजागी नाल्या व रस्त्यात पसरलेली घाण व होणारे प्रदूषण आणि त्यातूनच पसरत असलेली रोगराई व साथीचे रोग दूर करण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून फवारणी गावातील नाल्या रस्त्यांवर मारून गावातील नंदी पोळ्याच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना निरोगी राहण्याचा संदेश दिला आहे. त्यांचे हे कार्य गावकऱ्यांसाठी अभिनंदनीय असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

गावात सरपंच उपसरपंच व सदस्य गावाच्या विकासासाठी असतात पण सालोरी गावात याउलट कार्यक्रम सुरू असून दस्तुरखुद्द सरपंच यांचेच गावाच्या विकासासाठी चुकीचे धोरण असून गावात यांना विकास नको असल्याची बेजबाबदार वक्तव्य त्यांच्याकडून वर्तवली जातं असल्याच्या चर्चा आहे. मात्र गावाचे जबाबदार नागरिक म्हणून मनसे शाखा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंग बांधून गावातील समस्या निवारणाची कास धरली व एकामागून एक गावात उपक्रम राबवुन सालोरी गावाचे नवनिर्माण करण्याचा संकल्प करून ऐन तान्हा पोळ्याच्या दिवशी पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे गावात मच्छर डॉस व कीटक यापासून संरक्षण व्हावे याकरिता जंतुनाशक औषधी फवारणीचे अती महत्वपूर्ण काम हाती घेतले व ते पूर्ण सुद्धा केले. या उपक्रमात मनसेचे शाखा अध्यक्ष शुभम वाकडे, संदीप मोरे, रंगनाथ पवार,यांच्यासह मनसेचे कट्टर महाराष्ट्र सैनिक कुलदीप श्रिरामे आणि राजू रंदई, कुलदिप मोरे, सुभाष कलमेघे, शुभम मगरे, बाळकृष्ण श्रिरामे, आशिष मोरे, सूरज मोरे, एकनाथ पडाल, रामेश्वर वाघ, विशाल रंदई, हिरालाल शेलकर, संकेत डोंगरे, निखिल मोरे, गणेश तुमसरे व रमेश निखाते इत्यादी सदस्यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकाराने सालोरी गावात विकासाचा नवा विचार सुरू होऊन अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविल्या जातं आहे.

सालोरी गावांसह वलनी खातोडा या गावात सुद्धा जंतूनाशक फवारणी.

गटग्रामपंचायत सालोरी अंतर्गत वलनी व खातोडा ही दोन आदिवासी बहुल गावे येत असून या गावात सुद्धा सरपंच व सदस्य यांचे दुर्लक्ष आहे त्यामुळे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या गावात सुद्धा जंतुनाशक फवारणी करून तेथील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here