Home वरोरा ब्रेकिंग :- वरोरा तालुक्यातील पिंपळगाव जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची धाड.

ब्रेकिंग :- वरोरा तालुक्यातील पिंपळगाव जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची धाड.

जुगार खेळणाऱ्या 14 जुगारीविरोधात गुन्हे दाखल, दोन व चार चाकी वाहनांसह रोख रक्कम जप्त.

वरोरा प्रतिनिधी ;-

वरोरा भद्रावती क्षेत्रात जेव्हापासून उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी हे रुजू झाले तेव्हापासून अवैध व्यावसायिकांवर एक प्रकारचा वचक बसला असून प्रस्थापित राजकीय दरारा असलेल्यांना सुद्धा त्यांनी जेरबंद केल्याच्या घटना बघता असा पोलीस अधिकारी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देतो असा किमान वरोरा वाशीयांना विश्वास आहे, अशातच पोळ्याचा पाडवा साजरा करण्यासाठी तालुक्यातील पिंपळगाव (फत्तेपूर ) जुगार अड्डा भरविणाऱ्या 14 जुगारी यांना उपविभागीय अधिकारी नोपानी यांनी रंगेहात पकडल्याची घटना काल सायंकाळी समोर आली आहे. यामध्ये काही जुगारी फरार झाल्याची पण माहिती आहे.

तालुक्यातील (फ़त्तापुर)पिंपळगाव येथील एका ठिकाणी जवळपास 30 ते 50 जुगार खेळणाऱ्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांना कळताच त्यांच्या चमूने पिंपळगाव येथे जावून जुगार अड्डय़ावर धाड टाकली, दरम्यान जवळपास 14 जुगारी यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती असून त्यांच्याकडून 16 दोन चाकी 1 चार चाकी शिवाय 54300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांच्या नेत्रुत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चौरे. मनोहर आमने,उपपोलिस निरीक्षक मित्तलवार. दीपक मेश्राम,खुशाल निमगडे. दीपक दुधे इत्यादींनी केली. या कारवाईने जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Previous articleखळबळजनक :- बेनामी संपती कायद्यांतर्गत खासदार,आमदारांची संपती जप्त होणार ?
Next articleधनोजे कुणबी समाज अध्यक्ष म्हणून आवाजी मताने निवडून आलेल्या अँड सातपुते यांच्यावर आक्षेप ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here