Home वरोरा दखलपात्र:- सालोंरी गावालगत एसआरके कंपनीचे कोट्यावधीचे अवैध गौण उत्खनन.

दखलपात्र:- सालोंरी गावालगत एसआरके कंपनीचे कोट्यावधीचे अवैध गौण उत्खनन.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक शाखा पदाधिकाऱ्यांनी कंपनी चे अवैध गौण उत्खनन पाडले बंद. स्थानिक महसूल प्रशासन गप्प.

वरोरा प्रतिनिधी :

वरोरा तालुक्यातील वरोरा ते चिमूर या राष्ट्रीय सिमेंट रस्त्यांच्या बांधकामात एसआरके कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोट्यावधीचे अवैध गौण उत्खनन सालोरी गावालगत असलेल्या वन विभाग व महसूल च्या जागेवरून होतं असताना स्थानिक प्रशासन मात्र गांधीजीच्या तीन बंदरांच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान सालोरी गावाच्या नागरिकांनी बोलावलेल्या आमसभेत हा विषय चर्चेत आल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी एसआरके कंपनीने चे काम बंद पाडले.

एसआरके हया कंत्राटी कंपनीचे चुकीच्या पद्धतीने सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे सालोरी या गावांसह इतर गावांच्या शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळ्याचे पाणी गेलयाने शेतकऱ्यांचे धान पीक व कपाशी पीकअक्षरशः वाहून गेले. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एसआरके कंपनी व्यवस्थापनांकडे बाधित शेतकऱ्यांना घेऊन निवेदन देण्यात आले मात्र कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही त्यामुळे अगोदरच शेतपिकांचे नुकसान व दुसरीकडे कंपनी चे अवैध उत्खनन सुरू असल्याने सालोरी गावातील नागरिकांनी संताप व्यक्त करत एनओसी दाखवा अन्यथा काम बंद करा अशी घोषणा देत काम बंद पाडले. यावेळी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता कंपनीचे अधिकारी आले मात्र त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते त्यामुळे सगळ्या उत्खनन करणाऱ्या मशीन सह कंपनीचे कामगार माघारी परतले.

कंपनी चे काम बंद करून गावाच्या विकासासाठी रॉयल्टी द्या अशी यावेळी मागणी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाचे सालोरी या गावातील मनसे पदाधिकारी कुलदिप श्रिरामे यांच्या नेतृत्वात रंगनाथ पवार संदीप मोरे,राजू रंदई सोबतच शारदा मोरे, संगीता मोरे, सुशीला मोरे, सुंदरा मोरे, वाल्मिक मोरे, काशिनाथ मांडवकर, बंडू बावणे, विलास चौधरी, आकाश वाघ, प्रभूदास मोरे, अतुल ननावरे, भास्कर वाघ, विनोद बावणे, मनोज बावणे, विष्णू तुमसरे, शंकर वाढावी, लक्ष्मण काळे, मिथुन मडावी, मारोती जांभूळे संभा तुमसरे, आणि इतर ग्रामस्थांनी केलं. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के हे उपस्थित होते.

Previous articleब्रेकिंग :- वरोरा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांनी ठोकले कुलूप.
Next articleखळबळजनक :- पोलीस उपनिरीक्षक व एका जमादारात फ्री स्टाईल हाणामारी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here