नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तिने शिवसेना पुन्हा कात टाकणार ?
वर्धा : (प्रकाश झाडे ,विशेष प्रतिनिधी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये वर्धा जिल्ह्यातील नव्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल देवतरे यांनी दिली आहे. वर्धा जिल्हा संघटक पदी भारत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे वर्धा, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारत चौधरी हे डवलापूर ग्रामपंचायतीचे तीन वेळा सरपंच होते. तसेच २००७ ते २०१२ या काळात ते शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य होते. उपजिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांचे ते कट्टर
भारत चौधरी बाळू मिरापूरकर
समर्थक होते. मात्र, शिंदे काँग्रेसवासी झाल्यानंतर चौधरी हे शिवसेनेतच राहिल्याने त्यांच्यावर सेनेने ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. १९८८ मध्ये त्यांनी विद्यार्थी सेनेतून राजकारणात प्रवेश केला होता. याशिवाय उपजिल्हाप्रमुखपदी बाळू ऊर्फ श्रीकांत मिरापूरकर (वर्धा विधानसभा) यांची वर्णी लागली आहे, तर वर्धा तालुका प्रमुख म्हणून सुभाष कडे, बाळा साटोणे, सेलू तालुकाप्रमुख सुनील पारसे, सेलू तालुका संघटक म्हणून नितीन ढगे यांची वर्णी लागली.