Home वरोरा खळबळजनक :- खांबाडा येथील “आकाश बार” चा परवाना बेकायदेशीर ? बार चा...

खळबळजनक :- खांबाडा येथील “आकाश बार” चा परवाना बेकायदेशीर ? बार चा फलक गायब ?

आकाश बार चे मालक अंजनेयलु सम्बया जोंगेनी हया दारूमाफियांनी दिले राज्य उत्पादन शुल्क विभागात खोटे स्वयंघोषणापत्र.

वरोरा प्रतिनिधी :-

राज्य उत्पादन शुल्क विभागाने घाईघाईने अनेकांना बिअर बार, बिअर शॉपी व देशी दारू दुकानाचे परवाने देऊन एक प्रकारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू विक्री परवाना कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले असतानाच आता खांबाडा येथील आकाश बिअर बार चा परवानाच बेकायदेशीर असल्याची खळबळजनक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दाखल कागदपत्रातून समोर आली आहे. दरम्यान हॉटेल आकाश च्या ईटिंग लायसन्स विरोधात खांबाडा येथील तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांनी आक्षेप घेतला असता त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने त्यांनी नंतर तत्कालीन तहसीलदार यांच्याकडे लिखीत तकार परत घेत असल्याचे शपथपत्र दिले होते अशी सनसनिखेज माहिती आहे. दरम्यान आता नव्याने आकाश बार सुरू करतांना बार समोरिल आकाश बारच्या नावाचा फलक गायब असल्याने शंकेला उत् आला आहे.

वरोरा तालुक्यातील खांबाडा या गावात अंजनेयलु सम्बया जोंगेनी अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री करायचा व त्याच्यावर वरोरा, भद्रावती, माजरी, शेगांव या पोलीस स्टेशन मधे व जिल्हय़ाबाहेरिल पोलीस स्टेशन मधे सुद्धा दारूबंदी काळात व त्यांना लायसन्स मिळायच्या अगोदर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होते व आता सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ट आहे, असे असतांना त्यांनी दिनांक २५/६/२०२१ च्या स्वयंघोषनापत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला लिहून देताना माझ्यावर कोणत्याही पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल नसल्याचे नमूद केलेले आहे एवढेचनव्हे तर जर माझे गैरप्रकार उघडकीस आल्यास माझे लायसन्स रद्द होण्याच्या कार्यवाहीस मी पात्र ठरेल असे स्वाक्षरीनिशी घोषणापत्रात नमूद केले आहे त्यामुळे त्यांचा बेकायदेशीर आकाश बार चा परवाना रद्द होऊ शकतो पण खुद्द राज्य उत्पादन उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनीच आकाश बार बाबत माहिती अधिकारात माहिती देताना मूळ कागदपत्र हेच गहाळ केल्याने आकाश बार बेकायदेशीर असल्याचे समोर येत आहे.

अंजनेयलु सम्बया जोंगेनी हा खांबाडा येथे सन २००६ मधे बाहेर प्रांतातून आला होता व त्यांनी येथील एका व्यक्तीचे घर घेऊन सन २०१० च्या दरम्यान हॉटेल सुरू करण्याबाबत ग्रामपंचायत ला अर्ज केला होता. त्यावेळी ग्रामपंचायतने ना हरकत दिल्यानंतर एका सदस्याने यावर हस्तक्षेप घेतला पण त्याला जीवे मारण्याची धमकी दारू माफियां अंजू कडून मिळाल्याने त्यांनी आपली तकार परत घेतली व हॉटेल आकाश ला तहसीलदार यांच्या मार्फत ईटिंग लायसन्स देण्यात आले, पण खांबाडा येथे आकाश बार साठी ग्रामपंचायत ने कुठलीही एनओसी दिलेली नसून राज्य उत्पादन विभागाने पैसे घेऊन त्यांना हॉटेल च्या ईटिंग लायसन्स च्या बळावर बार चे लायसन्स दिलेले आहे हे स्पष्ट होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अनेक बार ला व बिअर शॉपी ला पैसे घेऊन परवाने दिले आहे व अंजनेयलु सम्बया जोंगेनी हा दारूबंदी काळात अट्टल अवैध दारू विक्रेता म्हणून कुप्रशिद्ध असताना त्याला बेकायदेशीर दारूचा परवाना दिला गेला आहे. यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सामील असून त्यांनी सुद्धा अंजनेयलु सम्बया जोंगेनी यांच्यावर गुन्हे दाखल नसल्याचे माहिती माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीत दिली आहे त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी बार लायसन्स करिता जे मूळ दस्तावेज आहे तेच लपवल्याने त्यांनी हे लायसन्स बेकायदेशीर दिल्याचे शीद्ध होतं आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दिल्याने आता या प्रकरणी आकाश बार चा परवाना रद्द होईल की पुन्हा अंजू अण्णा पैसे देऊन अधिकाऱ्यांना मैनेज करणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here