Home नागपूर ब्रेकिंग :-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘प्लॅन बी’ तयार, नितीन गडकरी होणार पंतप्रधान?

ब्रेकिंग :-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘प्लॅन बी’ तयार, नितीन गडकरी होणार पंतप्रधान?

जादूई आकड्याच्या खेळात मोदीला समर्थन मिळणे कठीण, सगळ्यांना घेऊन चालणारे मवाळ नेते नितीन गडकरी यांच्यावर शिक्कामोर्तब?

न्यूज नेटवर्क:-

देशात नुकतेच लोकसभेचे निकाल हाती लागल्यानंतर भाजप प्रणित एनडीए ला बहुमत मिळाले खरे पण भाजपला केवळ 240 खासदार मिळाले असल्याने मित्रपक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या नावाने समर्थन देणारं का? हा मोठा प्रश्न असून पक्षापेक्षा आपण मोठे आहोत अशा अविर्भावांत असलेल्या नरेंद्र मोदी यांची मित्र पक्षांना एलर्जी असल्याची भावना सगळीकडे दिसत आहे शिवाय व्यक्तिकेंद्रित राजकारण भाजपला लोकसभा निवडणुकीत चांगलेच महागात पडले आहे हे स्पष्ट दिसत असल्याने भाजपचा मोदी हा चेहरा पंतप्रधान पदी राहिल्यास मित्रपक्षाचे खासदार विरोधात जाऊ शकतात त्यामुळे करिष्मा हरवलेल्या मोदींच्या जागी जर जेष्ठ नेते नितीन गडकरी पंतप्रधान होत असतील तर खुद्द मित्रपक्षांसाह विरोधात असलेल्या अनेक छोट्या पक्षाच्या खासदाराचे समर्थन मिळून त्यांना पंतप्रधान करण्यासाठी एकमत होऊ शकते, दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यादृष्टीने ‘प्लॅन बी’ तयार असल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे.

गेल्या काही काळात मोदी व शहा हे संघाला गृहित धरत असल्याचे चित्र दिसून येत होते. भाजप हा संघापेक्षा वरचढ बनल्याचे चित्र तयार करण्यात आले होते. त्यामुळे संघातूनही मोदी-शहा यांच्या नेतृत्वाबाबत अस्वस्थता व नाराजी आहे. दरम्यान भाजपला स्वबळावर बहुमत न मिळाल्याने एनडीएतील मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. मात्र, मोदी-शहा जोडगोळीच्या हेकेखोर नेतृत्वावरून एनडीएत धुसफूस झाल्यास मवाळ व सर्वमान्य नेतृत्व म्हणून नितीन गडकरींचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येऊ शकते.

नितीन गडकरी हे संघाच्या तालीम मध्ये वाढलेले आहे व त्यांची भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कारकीर्द गाजली होती, अर्थात संघाचे ते पारिवारिक सदस्य असल्याने संघांचे विशेष प्रेम त्यांच्यावर आहे, त्यामुळे पक्षात सर्वकाही आपणच आहो मी म्हणेन तेचं करायचं हा एकाधिकार व घमंड बाळगणारे मोदीं यांना पक्षांतर्गत मोठा विरोध होणार आहे, शिवाय इतर पक्षांतील नेत्यांशींही गडकरी यांचे चांगले संबंध असल्याने भाजपला सरकार स्थापण्यात काही अडचण आल्यास गडकरींचे नाव संघाकडून पंतप्रधानपदासाठी पुढे केले जाऊ शकते असे संकेत मिळत आहे.

महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट होत असताना नागपूर लोकसभा मतदारसंघातून मात्र भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल १ लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. नितीन गडकरी हे भाजपचे एकमेव असे नेते आहेत, ज्यांच्या नावाला ठाकरे गटासह काही विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो. महाराष्ट्रातील मराठी व्यक्ती पंतप्रधान होत असले तर शिवसेना ठाकरे गट पुन्हा एनडीएसोबत जाऊ शकतो. यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या एकूण मनसुब्यांवर पाणी फेरता येऊ शकते, असा विचारही संघ वर्तुळात सुरू आहे त्यामुळे नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार म्हणून संघ समोर करू शकतात असे चिन्ह दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here