मनोरुग्ण मुलीला नागपूरच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये केले भरती, सर्वत्र कौतुक. असे मनोरुग्ण आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन.
वरोरा :-
सामाजिक कार्याच्या विडा उचलेले व जनसेवेतून ईश्वर सेवा घडते यावर विश्वास असणारे वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजित पावडे हे वरोरा तालुक्यातील शेगाव परिसरातील गोरगरीब, दुःखी, पिडीत जनतेसाठी देवदूत बनले आहे, अनेकांचे जीव वाचविण्यासाठी स्वतःचे अनेक वेळा रक्तदान करणारे अभिजित पावडे हे गुडडू म्हणून परिचित आहे आणि याचं गुडडूनी एका मनोरुग्ण मुलीला नागपूर च्या मेंटल हॉस्पिटल मध्ये स्वखर्चाने भरती करून नवा आदर्श निर्माण केला आहे, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून नवंयुवकांपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे
मिळालेल्या माहितीनुसार दिलीपभाऊ बोधाने तसेच परिसरातील नागरिकांच्या विनंतीनुसार गुडडू पावडे आणि त्यांचे सहकारी यांनी गावातील मनोरुगन मुलीला नागपूर येथे मेंटल दवाखान्यात भरती केले. तसेच परिसरात कुणाच्या समंधित असे रुग्ण असल्यास आम्हाला कळवा आम्ही त्यांना भरती करण्यास सहकार्य करू असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले.