Home वरोरा गंभीर :- उद्योजक प्रकाशचंद मुथा यांच्या माढेळी येथील पारस जिनिंगमधील कापसाला लागली...

गंभीर :- उद्योजक प्रकाशचंद मुथा यांच्या माढेळी येथील पारस जिनिंगमधील कापसाला लागली आग.

जवळपास 90 लाखांचा कापूस जळून खाक, आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात?

वरोरा :

तालुक्यातील सर्वात मोठी कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माढेळी येथील उद्योजक प्रकाशचंद मुथा यांच्या पारस जिनिंगमध्ये खरेदी केलेल्या कापसाला मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास भीषण आग लागून सुमारे १३०० क्विंटल कापूस (किमंत ९१ लाख) जळून खाक झाल्याची माहिती असून आगीचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहें,

माढेळी येथील पारस जिनिंगमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस नेहमी प्रमाणे ठेवण्यात आला होता. दोन दिवसांत त्याच्या गाठी बांधण्यात येणार होत्या. याच साठवलेल्या कापसातून अचानक आगीचा भडका उडाल्याचे जिनिंगमधील कामगारांना दिसले. त्यांनी लगेच ही माहिती मालकांला दिली. जिनिंगमधील पाण्याने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. काही वेळाने नगर परिषद व जिएमआर कंपनीच्या फायर बिग्रेडच्या गाड्या आल्या व काही वेळाने आग आटोक्यात आली.

दरम्यान कापूस उचलणाऱ्या जेसीबी यंत्राच्या लोखंडी बकेट व सिमेंट फ्लोरिंगमध्ये झालेल्या घर्षनातून ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीलगत असलेल्या कापूस गाठी त्वरित उचलण्यात आल्याने मोठे नुकसान टळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here