सामाजिक नेत्या योगिता लांडगे यांच्या नेतृत्वात झालेल्या या महिला दिनाच्या महोत्सवात शेकडो महिलांचा सहभाग.
वरोरा प्रतिनिधी :-
जिजाऊ क्रांती दलाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिला महोत्सवाचे यशस्वी आयोजन 23 मार्च 2025 रोज रविवारला पोलीस स्टेशनं समोर असलेल्या सिद्धिविनायक सभागृहात महिलांच्या भरगच्च उपस्थिती पार पडला, यावेळी मंच्यावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्ह्णून माजी पालक मंत्री तथा पर्यावरण व वने संस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांच्या पत्नी आणि आमदार करण देवतळे यांच्या आई श्र्वेताई देवतळे होत्या तर उद्घाटक म्हणून वसुधा शभुराज वारघणे ह्या होत्या, प्रमुख अतिथी म्हणून यशस्वी उद्योजक तथा व्यापारी असोसिएनचे अध्यक्ष शभूराज वरघणे. मुख्य आरोग्य सेविका बरडे, शहीद योगेश डाहूले यांचे मातापिता तसेच शहीद आषय निकुरे यांचे मातापिता उपस्थित होते.
या महिला महोत्सवाचे प्रास्ताविक जिजाऊ क्रांति दलच्या अध्यक्षा योगिता लांडगे यांनी केले, त्यात त्यांनी वरोरा भद्रावती तालुक्यात जिजाऊ क्रांति दल चे माध्यमातून जे विविध समाजपयोगी उपक्रम राबविले ते मांडून येणाऱ्या काळात जिजाऊ क्रांति दलाच्या माध्यमातून जे विविध उपक्रम राबविल्या जाणार आहें त्याची माहिती दिली आणि महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टीने महिलांचे सक्षमीकरण करण्याची योजना लवकरच राबविणार असल्याची त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून दिली.
पुरुषासोबतच महिलांनी सुद्धा बरोबरीने राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रात मजल मारली असून जिजाऊ क्रांति दल चे माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिला पासुन तर अधिकारी महिलामहिला सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे मत योगिता लांडगे यांनी व्यक्त केले
कार्यक्रमाचे संचालन उज्वला पोइंकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राशिधा शेख यांनी केले. कार्यक्रमाला महिलांनी अतिशय मेहनतीने सामाजिक विषयावर पथनाट्य तसेच विविध प्रकारच्या संस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच Dr. हिवरकर आणि Dr. मोणू ढोले यांनी आरोग्य तपासणी केली. वंदना बरडे ताई यांच्ये ग्रामीण रुगणालय वरोरा यांचे टीमने HB. तपासणी करण्यात आली कार्यक्रमा ला ढोके ताई बेलेकर ताई यांनी सहकार्य केले, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माधवी घ्यार, मनिषा लोंनगाडगे, दिपा लभाने, महेश बिबटे, कमलेश, संध्या माकोडे. शमा नैताम सविता देठे, सगिता पारखी अलका पचारे यांनी परिश्रम घेतले.