खांबाडा येथील बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचाराने 11 वर्षीय समताच्या मृत्यूने वडील मोरेश्वर नाईक आत्महत्त्या करण्याच्या उंबरठ्यावर?
प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करून शेवटचा इशारा देण्यासाठी प्रसारमाध्यमांना व्हिडीओ पाठवले.
वरोरा प्रतिनिधी:–
“भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते’ या महाकवी ग्रेस यांच्या दोन ओळी नेमकी काय साद घालत असतील हे कुणालाही कळणार नाही, कारण महाकवी ग्रेस यांचं आयुष्यच एक रहस्य होतं आणि म्हणूनच त्यांच्या कवितासुद्धा एक रहस्य म्हणूनच शतकानुशतके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहें, यात शंकाच नाही. मात्र ग्रेस यांच्या कवितांमधील अर्थ शोधण्याचा प्रयत्न कधी कुणी केला असेल तर त्यात जे मर्म आहें त्याचं गांभीर्य हे अनाकलनीय आहें, अशाच प्रकारचं मुलीच्या दुःखद मरणाचं अनाकलनीय दुःख घेऊन रोज 11 वर्षीय समता च्या आठवणीने व्याकुळ झालेले व आत्महत्त्या कारण्याच्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहचणारे वडील मोरेश्वर नाईक हे माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आक्रोश करत आहें, पण ना आरोग्य प्रशासन कारवाई करायला तयार आहें, ना पोलीस प्रशासन, म्हणूनच मुलीच्या वियोगाने तडफडत मृत्यूला कवटाळण्याचा त्यांचा प्रयत्न महाकवी ग्रेस यांच्या “भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते’ या ओळीने स्पष्ट होते. मात्र मग मी पण तुझ्याकडे येऊ का? या सूचक वक्तव्याने त्यांचं काळीच किती वेदनेने व्याकुळ झालं असेल व ते आत्महत्त्या करण्याचा का विचार करत असेल याची कल्पना येते.
वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे मंडल ह्या बोगस डॉक्टर मुळे किती रुग्णांचे मृत्यू झाले असतील हा शोधाचा भाग असला तरी मोरेश्वर नाईक यांच्या 11 वर्षीय मुलीचा मृत्यू चुकीच्या गावठी उपचारामुळे झाला हे आता स्पष्ट झाले आहें, मात्र स्थानिक तालुका आरोग्य अधिकारी डॉ बाळू मुंजनकर यांचा आशीर्वाद आणि स्थानिक खांबाडा येथील धनंजय मेडिकल चे धनंजय बोरीकर यांचा साथ यामुळे बोगस डॉक्टर मंडल यांचा दवाखाना मात्र बंद झाला नसून अजून एका मृत्यूच्या शोधात तो डॉक्टर आहें का? की प्रशासनाला पुन्हा एक मृत्यू हवा आहें हे कळायला मार्ग नसून माझ्या मुलीच्या मारेकऱ्यावर कारवाई होतं नसेल तर मी वरोरा पोलीस स्टेशन समोर आत्महत्या करणार असा मृतक समता चे वडील मोरेश्वर नाईक यांनी व्हिडीओ काढून व पत्रकारांना भ्रमणध्वनी वरून प्रशासनाला इशारा दिला आहें,