Home वरोरा सनसनी:- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक थोरात यांच्यावर गुन्हे दाखल होणार?

सनसनी:- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक थोरात यांच्यावर गुन्हे दाखल होणार?

वरोरा येथून मुंबई ला बदली झालेले थोरात हे वरोरा भद्रावती सह ब्रम्हपुरी क्षेत्रातील बोगस अहवाल करून दारू परवाने दिल्या प्रकरणी एसआयटी चौकशी च्या घेऱ्यात.

वरोरा:-

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या विरोधात दारू परवाना धाराकांकडून अवैध हप्ता वसुली व बोगस दारू परवाने दिल्याच्या संबंधाने महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून अनेक तक्रारी शासन स्थरावर वरिष्ठाकडे करण्यात आल्या होत्या, दरम्यान घुघूस येथील एका बिअर शॉपी परवान्या करिता एक लाख रुपयाची लाच घेतांना त्यांचे कार्यालयीन सहाय्यक अधीक्षक व निरीक्षक एसीबी च्या जाळ्यात अडकल्याने अधीक्षक संजय पाटील यांच्यावर पण गुन्हे दाखल होऊन त्यांना जेल वारी करावी लागली होती, खरं तर त्यावेळी वरोरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात निरीक्षक असलेले विकास थोरात यांनी सुद्धा अनेक बोगस अहवाल व त्यानंतर बिअर बार बिअर शॉपी व देशी दारू दुकानाचे स्थांनंतरण प्रकरणी मालसुतो अभियान चालवले असल्याने त्यांचेवर सुद्धा गुन्हे दाखल होणार अशी अपेक्षा होती मात्र तसें झाले नाही मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तत्कालीन महायुती सरकार कडे राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या अवैध दारू परवान्या संबंधाने एसआयटी चौकशी करा अशी मागणी करण्यात आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी शासनाकडे ही मागणी लावून धरल्यानंतर अखेर एसआयटी चौकशी लावण्यात आली आहें, या चौकशीत निरीक्षक विकास थोरात यांच्या विरोधात सबळ पुरावे एसआयटी प्रमुख लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांचे कडे दिल्याने विकास थोरात यांची बदली झाली असली तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता आहें.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना नवीन बिअर शॉपी च्या परवण्यासाठी 1 लाख रुपयाच्या लाच प्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला, मात्र त्यांच्यासोबत काम करणारे व वसुलीच्या हिस्यात भागीदार असणारे थोरात, अभिनंदन, पवार, क्षीरसागर व लिचडे यांची चौकशी झाली का ? हा प्रश्न अनुत्तरीत होता कारण दरमहा प्रत्येक बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉपी व देशी दारू दुकान मालकाकडून तीन हजार ते तीस हजार रुपये एवढी रक्कम वसुली करणारे वरील अधिकारी यांनी अधीक्षक संजय पाटील यांच्यासोबत मिळून मोठी माया जमवली याचीही चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे होणार अशी माहिती आहें.

दरम्यान वरोरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास थोरात यांच्याकडे वरोरा भद्रावती चिमूर ब्रम्हपुरी नागभीड सिंदेवाही इत्यादी तालुक्यातील नवीन जुने बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉपी, देशी दारू दुकानें यांना परवाने देण्यासाठी किंव्हा दुकाने स्थानांतरित कारण्याकरिता स्पॉट पंचनामा अर्थात अहवाल तयार करण्याचे काम होते, मात्र यांनी कुठलीही मोका चौकशी न करता परस्पर पैसे घेऊन अनेक बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉपी व देशी दारू दुकानाना बनावट केसेस बनवून परवाने दिल्याची बाब आता उघड झाली असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वरील बोगस अहवाल व परवाने संदर्भात अँड शुक्ला यांनी पिटीशन दाखल केली आहे व ती न्यायाप्रविष्ट आहें

भद्रावती येथील दोन देशी दारू दुकान, वरोरा येथील बोर्डा चौकातील देशी दारू दुकान, ब्रम्हपुरी येथील वाईन शॉपी व व्याहाड येथील वाईन शॉपी हे सगळे नियम धाब्यावर बसवून स्थानांतरित करण्यात आले, त्यांचा अहवाल हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास थोरात यांनी तयार केल्याने त्यांनी या प्रकरणात लाखों रुपयाची माया संबंधित व्यवसायिकाकडून मिळवली असल्याचा आरोप आहे, त्यामुळे अधीक्षक संजय पाटील च्या बेहिशोबी संपत्ती सह थोरात, अभिनंदन, पवार, क्षीरसागर व लिचडे यांच्याही संपतीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here