जनतेच्या तक्रारी चे निवारण करण्यास असमर्थ असल्याची ग्राहकांची तक्रार.
वरोरा :-
एकाच तालुक्यात अनेक वर्ष कार्यरत एम एस ई.बी वरोरा शहर अभियंता प्रफुल लालसरे यांच्या विरोधात आता आक्रोश बघावंयास मिळत असून स्थानिक वीज ग्रहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यास ते कुचराई करत असल्याच्या तक्रारी जोर धरू लागल्या आहें, दरम्यान त्यांची बदली झाली असतांना ते इथेच पुन्हा राहण्यास इच्छुक असून त्यांनी वरिष्ठाकडे फिल्डिंग लावल्याची पण माहिती समोर येत आहें, शहरात मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांच्या तक्रारीला बेदखल करून आपल्या अधीनस्त कर्मचाऱ्यावर आपल्या पदाचा खौफ दाखवून त्यांना जलील करणारे हे अभियंता कार्यालयीन कामात भ्रष्टाचार पण करत असल्याने यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी होतं आहें.
वरोरा शहरातील एमएसईबी अभियांत्याच्या कहाण्या सर्वांना माहीत आहें त्यात एकाला एसीबी ने ग्राहकांकडून लाच घेतांना रंगेहात पकडले आहें, मात्र जो दिसेल तो फसेल अशी एकूण स्थिती असून माढेळी ते वरोरा मिळून जवळपास 7-8 वर्ष काळ झालेल्या प्रफुल लालसरे यांच्या भ्रष्ट कहाण्याचा पाढाच आता वाचला जाण्याची शक्यता आहें, त्यामुळे एकाच सर्कल मध्ये एवढी वर्ष काम करणाऱ्या लालसरे यांची एमएसईबी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदली करून शहराला एक चांगला अभियंता द्यावा अशी मागणी वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहें.