मनसेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. महसूल अधिकारी झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करीत असल्याने मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा.
भद्रावती (जावेद शेख)
:-
भद्रावती तालुक्यातील रेल्वेच्या ३ ऱ्या लाईनला मुरुम टाकण्यासाठी जे उत्खनन सोनाई इन्फाट्रक्चर प्रा. लि द्वारे नंदोरी परिसरात कारण्यात आले होतें तें मंजूरी पेक्षा 50 पट करण्यात आल्याने व ज्या शेतीतून गौण खनिज उत्खनन करण्यात आले त्यांचे मोजमाप नं करता स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासोबत संगनमत करून कंपनीने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवीला गेल्याने या कंपनीवर फौजदारी व दंडात्मक कारवाई करा अन्यथा या परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन भद्रावती तहसील कार्यालयात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तर्फे निवेदनातून देण्यात आला.
नंदोरी परिसरातील शेतात मोठया प्रमाणात गौण खनिज उत्खनन होऊन मोठं मोठे खड्डे पडले आहें, त्या खड्ड्यात आता पाणी साचल्याने जनावरे पडून मरण्याची व येथील जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहें, त्यामुळे सोनाई इन्फाट्रक्चर प्रा. लि कंपनीवर दिलेल्या मंजुरीच्या पन्नास पटीने गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागाने फौजदारी व दंडात्मक करायला हवी पण तेचं अधिकारी कंपनी चे संरक्षण करत असून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवीला जात आहें त्यामुळे मनसे तर्फे जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी कारण्यात आली आहें, दरम्यान कंपनीवर फौजदारी व दंडात्मक कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्मान सेनेतर्फे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहें.
महसूल अधिकाऱ्यांचे झोपेचे सोंग?
मिळालेल्या माहितीनुसार सोनाई इन्फाट्रक्चर प्रा. लि कंपनीने कमी ब्रासची परवानगी घेवून ज्यादाचे उत्खनन केल्याची बाब उघड झाली आहें, ८ हजार ब्रासची परवानगी व २ लाख ब्रासचे वर उत्खनन करण्यात आले त्यामुळे शासनाचा शेकडो कोटी महसूल बुडवीला गेल्याने तो माहीत असतांना जर महसूल अधिकारी झोपेच सोंग घेऊन त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर निश्चितपणे महसूल अधिकारी सुद्धा त्यामध्ये सामील आहें आणि म्हणूनच त्या दोषी महसूल अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होणे आवश्यक आहें.
स्थानिक तहसीलदार यांनी या संदर्भात कुठलीही पाहणी नं करता परस्पर गौण खनीज उत्खननाला परवानगी दिली असल्याचा गंभीर प्रकार असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सुद्धा जर कारवाई होतं नसेल व कंपनी ला वाचविण्याचा प्रयत्न होतं असेल तर नदोरी येथील शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे जनआंदोलन करेल असा इशारा राजू कुकडे यांनी दिला आहें.