बहुआयामी व्यक्तीमत्वाचे धनी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असलेले अँड. श्रीपाद पाटील काळाच्या पडद्याआड.
वरोरा प्रतिनिधी :-
कोरोना महामारी च्या भयंकर परिस्थितीत आपल्या माणसांना जणू देव हिरावून घेतोय का? असा प्रश्न आता सर्वांना पडायला लागला आहे, कारण एका क्षणात जणू होत्याचे नव्हत्यात रूपांतर होतांनाचे द्रुष्य बघतांना मनाच्या वेदना उबाळून येत असतात अशीच एकूण परिस्थिती निर्माण झाली आहे.
वरोरा शहरात आपल्या ऊत्कृष्ट तबलावादनाने सर्वांना मोहित करणारे व अष्टपैलू गुणांनी परिचित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अँड. श्रीपादजी पाटिल ह्यांच आज दु:खद निधन. प्रा.श्रीकांत पाटील यांचे बंधू अँड.श्रीपाद पाटील हे अत्यंत सोज्वळ,निरागस संयमी,ज्ञानाची सदा भूक निर्माण करणारे,अथांग कलांना गवसणी घालणारे पण तरीही अभिमानाचा लवलेश कदापी लागू न देणारं हे व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड झाल्याने अनेकांची मन सुन्न झाली पण नियतीला तेच मंजूर असेल त्यामुळे त्यांना त्यांच्या आप्तस्वकीय इष्टमित्र व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या गराड्यातून त्यांना परमेश्वराने बोलवल असेल, त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वास भूमिपूत्राची हाक समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.