महाराष्ट्र राज्य विज्ञान परिषदेच्या विविध उपक्रमांची त्यांनी सांभाळली होती जबाबदारी.
वरोरा प्रतिनिधी :-
लोक शिक्षण संस्था, वरोरा द्वारा संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य म्हणून विलास पांडुरंग कावलकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
कृषी विषयात स्नातक पदवी प्राप्त कावलकर यांनी 29 वर्षे विज्ञान विषयाचे अध्यापन केले आहे .महाराष्ट्र राज्य विज्ञान परिषदेच्या विविध उपक्रमांची जबाबदारी त्यांनी सांभाळली असून ते लोकशिक्षण संस्थेचे सभासद ही आहेत. विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत कावलकर यांचे लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील ,उपाध्यक्ष प्रा अनिल डोंगरे, कार्यवाह श्रीकृष्ण घड्याळपाटील ,प्रा मिलिंद देशपांडे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.