सामाजिक कार्यकर्त्या रंजना पारशिवे यांनी वाढदिवसाचे आयोजन करून फुलवला महिलेच्या चेहऱ्यावर आनंद.
वरोरा प्रतिनिधी :-
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचा सहस्त्रदर्शन सोहळा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात साजरा होत असताना दुसरीकडे त्यांच्याच शिष्य असलेल्या रंजना मनोहर पारशिवे या सामाजिक कार्यकर्त्यां महिलेनी समाजासमोर एक प्रेरणादायक प्रसंग ठेऊन दुःखातही सुखांचा आनंद मिळावा म्हणून विधवा असलेल्या नम्रता गणेश चिंचोलकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला काही महिन्यापूर्वी नम्रताचे पती गणेश अल्पशा आजाराने मरण पावले गणेश घरचा जरी गरीब असला तरी सुद्धा आपल्या बायकोचा वाढदिवस न चुकता आपल्या गरिबी प्रमाणे साजरा करायचा. ही बाब जेंव्हा सामाजिक कार्यकर्त्या रंजना मनोहर पारशिवे यांना कळताच त्यांनी माजी विधानसभा मोरेश्वर टेमुर्डे यांच्या वाढदिवशी त्यांच्या वाढदिवस साजरा केला व सोबतच नम्रताचा सुद्धा वाढदिवस साजरा केला.
माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमूर्डे यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता वार्डातील महिलांना त्यांच्या घरी बोलवायला रंजना पारशिवे गेल्या असता त्यावेळेस त्यांनी नम्रताच्या डोळ्यातले अश्रू बघितले त्या दिवशी तिचा सुद्धा वाढदिवस होता आणि त्यांना खूप वाईट वाटलं. आणि त्यांनी ठरवलं की नम्रताचा सुद्धा वाढदिवस साजरा करायचा आणि रंजना पारशिवे यांनी आपल्या घरी वाढदिवस साजरा केला आणि नम्रताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला हा प्रसंग सर्वच महिलांना प्रेरणादायी होता.