Home वरोरा अत्यंत गंभीर :- ठाणेदार गावडेच्या हस्तक्षेपामुळे मला आत्महत्या करण्याची वेळ.

अत्यंत गंभीर :- ठाणेदार गावडेच्या हस्तक्षेपामुळे मला आत्महत्या करण्याची वेळ.

पीडित विकास चिंचोलकर यांची न्यायासाठी राज्य मानवी हक्क आयोगाकडे आर्त हाक.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

राज्यात ज्या पद्धतीने राजकीय कलगीतुरा सुरू आहे, म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी सत्य असत्य यामधील भेद दूर ठेऊन अस्तित्वाची लढाई सुरू आहे, जी मतदारांच्या मतदानाचा अपमान आणि अवमान करणारी आहे, तशीच लढाई पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची पैसा कमावण्यासाठीची गुप्त लढाई ही सर्वसामान्य पीडित व्यक्तींना वेदना देणारी व त्यांना आत्महत्या करण्यास प्रव्रुत्त करणारी आहे. ही घटना आहे आष्टी पोलीस स्टेशनची जिथे पती पत्नीच्या वादात चक्क ठाणेदार गावडे शिरले आणि पतीला घराबाहेर काढण्यात आले, एरव्ही सदरक्षणाय खलनिग्रहनाय या ब्रीद वाक्याचा जप करणारे पोलीस प्रशासन एका बापाला त्याच्या छोट्याशा मुलीपासून दूर करतांना भावनाशून्य दिसले हे खरे तर पोलिसांनी आपल्याच वर्दिचा जबाबदारीचा जोखडातून बाहेर येऊन सैरावैरा पाळण्यासारखे आहे, पण दुर्दैवी प्रकार विकास चिंचोलकर यांच्या वाट्याला आला.

आष्टी येथे विकास ची पत्नी राहते व तिची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक गडचिरोली च्या आष्टी तालुक्यात ड्युटी आहे, पण तिचा पती विकास सोबतचा वाद सुरू आहे. दरम्यान पत्नीला पती विकास नको अशी स्थिती आहे पण का नको तर तिला दुसऱ्यासोबत राहायचं असं विकास सांगतो पण आठ वर्षांची मुलगी सोडून मी राहू शकत नाही म्हणून विकास यांनी आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार गावडे यांच्याकडे विनवणी केली की किमान मला माझ्या मुलीला तरी भेटू द्या पण ठाणेदार गावडे यांनी अगोदरच पत्नीच्या बाजूने आपली भूमिका दर्शवल्याने व माझ्या पत्नीचा वादात ठाणेदार गावडे शिरल्याने विकास ने राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली, दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पण तक्रारी केल्या, विकास ला आता राज्य मानवी हक्क आयोगाकडून मेसेज आला की तुम्हचि केस आम्ही सुनावणी करिता घेतली आहे व येत्या सप्टेंबर ला मुंबई येथे हजर राहायचे आहे. पण जर विकास ला तिथे सुद्धा न्याय मिळाला नाही तर ठाणेदार गावडे यांच्या विरोधात चिठ्ठी लिहून मी आत्महत्या करेन असा इशारा विकास चिंचोलकर यांनी दिला आहे.

Previous articleपुढील 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता;
Next articleप्रवास्यांच्या सुरक्षतेसाठी प्रवासी वाहतूक बसेसची योग्य तपासणी करा – आ. किशोर जोरगेवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here