Home वरोरा अखेर मनसेच्या दणक्याने टॉवर लाईन धारक शेतकऱ्यांना मिळाला न्याय.

अखेर मनसेच्या दणक्याने टॉवर लाईन धारक शेतकऱ्यांना मिळाला न्याय.

महाराष्ट्र सैनिक मोहित हिवरकर यांच्या पुढाकाराने दहा शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात पैसे जमा.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील नागरी, उखर्डा, जळका, गिरसावळी, माढेळी, वंधली, आमडी व निलजई येथील शेतकऱ्यांच्या शेतातून टॉवर लाईन चे वीज वाहक तार टाकण्याचे काम सुरू होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतातील मोजमाप करून त्यात किती जागा यासाठी व्यापली आहे हे बघून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली होती व ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही टॉवर लाईन जाते जाईल त्यां शेतकऱ्यांना 45 दिवसात ठराविक मोबदला देण्याची हमी करनूल ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनी व्यवस्थापक यानी दिली होती त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टॉवर लाईन टाकण्याचे काम कंपनीला करू दिले पण सहा महिने लोटून सुद्धा कंपनीचे अधिकारी यांनी आपले टॉवर लाइन चे काम पूर्ण तर केले मात्र शेतकऱ्यांचा मोबदला दिला नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी मनसेच्या पदाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. मनसेचे मोहित हिवरकर यांनी लागलीच सर्व शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालय गाठले व निवेदन देऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्या अन्यथा आम्ही करनूल ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांना मनसे पदाधिकारी यांनी फोनवरून याबाबत तंबी दिली होती.

दिनांक 11/3/2023 ला झालेल्या करारनाम्यानुसार कलम 68 आणि 164 चीज कायदा 2003 भारतीय टेलीग्राफ जंक्ट 1885 आणि सीईए (सेफ्टी अँड इलेक्ट्रिक सप्लाय मार्गदर्शक तत्वांच्या 2010 च्या भाग -2 सह इतर नियमानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी करार करण्यात आला परंतु मागील पांच महिन्यांपासून शेतकऱ्यांना कंपनी चे लोकं झुलवत आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांनी कंपनी च्या अधिकाऱ्यांविरोधात एल्गार पुकारला असून कंपनीच्या कार्यालयासमोर घंटानांद आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोहित हिवरकर यानी दिला आहे.

करनूल ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीचे टॉवर लाईन चे तार तुटल्याने शेतकरी चिंतेत होते दरम्यान कंपनी चे अधिकारी शेतात पोहचले तेंव्हा जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे देणार नाही तोपर्यंत कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कामगारांना काम करू देणार नसल्याचा पवित्रा मनसेचे मोहित हिवरकर यांनी घेतल्याने अखेर कंपनी अधिकाऱ्यांनी गावात येऊन सोबत  अनिकेत तुरारे पुंजारामजी चौधरी राजुजी गाणफाडे मयुर वैद्य शिवाजी राऊत जगदीश पेटकर व अन्य ऑनलाइन पैसे दिले व उर्वरित शेतकऱ्यांना एका आठवड्यात पैसे देणार असल्याची ग्वाही दिली. दरम्यान सहा महिने रखडलेले पैसे शेतकऱ्यांना मिळवून देणाऱ्या मनसेच्या मोहित हिवरकर यांचे सर्वत्र आभार व्यक्त करण्यात येतं आहे.

Previous articleसोयाबीनवर आलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा.
Next articleकोल इंडिया की सहायक कंपनी MCL के नए सीएमडी बने उदय कावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here