Home वरोरा प्रसंशनीय:- टायगर ग्रुपचे रिषभ रठ्ठे सामाजिक कार्यातून बनले युवकांचे आयकॉन.

प्रसंशनीय:- टायगर ग्रुपचे रिषभ रठ्ठे सामाजिक कार्यातून बनले युवकांचे आयकॉन.

३१ डिसेंबरला वाढदिवसानिमित्त अंबादेवी मंदिर परिसरात झालेल्या रक्तदान कार्यक्रमात भल्याभल्यांची हजेरी.

वरोरा प्रतिनिधी :-

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या अनेक कार्यकर्ते व नेत्यांना त्यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची प्रशिद्धि करण्याची संधी असते व मोठमोठे बैनर शहरात लावून आणि भला मोठा केक कापून कार्यक्रमाचे आयोजन असते, पण महाराष्ट्रात टायगर ग्रुपचे महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी जाधव यांनी त्यांच्या टायगर ग्रुपच्या सदस्यांना मंत्र देऊन परंपरागत वाढदिवस उत्सवाला फाटा देत टायगर ग्रुपच्या सदस्यांचा वाढदिवस म्हणजे सामाजिक उपक्रम म्हणून साजरा करण्याची नवी प्रथा रूढ केली, आज तोच वारसा जोपासत वरोरा शहर व तालुक्यात आपल्या सामाजिक कार्याने युवकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे रिषभ रठ्ठे यांनी स्वतःचा वाढदिवस (३१डिसेंबर) स्थानिक अंबादेवी मंदिराच्या आवारात भव्य रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा केला, विशेष म्हणजे वरोरा शहरातील अनेक राजकीय व सामाजिक नेत्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून रिषभ यांच्या सामाजिक उपक्रमाची तोंड भरून स्तुती केली आणि भरभरून शुभेच्छा दिल्या.

वरोरा शहरातचं नव्हे तर तालुक्यातील प्रत्तेक गावात टायगर ग्रुपचा सामाजिक उपक्रम पोहचविणारे रिषभ रठ्ठे यांनी युवकांची मोठी फौज उभी केली आहे. कुठलाही राजकीय सामाजिक वारसा नसतांना स्वतःच्या बळावर एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला पण शक्य नसलेलं सामाजिक संघटन उभं करून युवकांच्या मनात आपलं आदराचं स्थान निर्माण केलं, एखादं परिवर्तन करायचं असेल तर युवा जागला पाहिजे आणि जेंव्हा युवा जागतो तेंव्हा नव्या क्रांतीचा जन्म होतो तीच क्रांती घडविण्यासाठी रिषभ रठ्ठे सारखा युवक पुढे येतांना दिसतं आहे, देशात ज्या पद्धतीनं नव्या गुलामगिरीचा उदय होतांना दिसतं आहे, बेरोजगारी महागाई आणि सामाजिक द्वेष्याच राजकारण सुरु आहे आणि आर्थिक सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीत युवक दिशाहीन झाला आहे त्या युवकांना टायगर ग्रुप च्या माध्यमातून निश्चितपणे एक दिशा देण्याचं काम  रिषभ रठ्ठे सारखा युवक करतो त्यामुळे तो युवकांचा आयकॉन ठरत आहे त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांना प्रेरणा देणारे काम घडेल अशी आशा करू या आणि नव्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात रिषभ रठ्ठे यांचं सामाजिक कार्य असेच सुरू राहिलं अशी अपेक्षा करू या. भुमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल संपादकीय मंडळाकडून त्यांना पुढील कार्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here