Home भद्रावती भद्रावती शहरात पोलिसांच्या रुट मार्च मुळे भद्रावतीकर सुखावले !

भद्रावती शहरात पोलिसांच्या रुट मार्च मुळे भद्रावतीकर सुखावले !

उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे यांची उपस्थिती !

( जावेद शेख /उमेश कांबळे )

देशात कोरोना व्हायरस रुग्णांच्या वाढत्या संख्येने एकीकडे जनजीवन स्तब्ध झाले असतांना पोलिस प्रशासन मात्र दिवसरात्र आपली अमूल्य सेवा जनतेच्या रक्षणासाठी देत आहे. महत्वाची बाब म्हणजे पोलिस विभागाच्या सतर्कतेमुळेमुळेच आज भारतात कोरोना व्हायरसवर वर आपण अंकुश ठेवू शकलो आहे, त्यामुळे लॉक डाऊनच्या गंभीर परिस्थितीत पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेने आपली ताकत दाखवून जनतेला सजगतेचा ईशारा देण्यासाठी भद्रावती पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी रूट मार्चचे आयोजन करून जनतेला कोरोना पासून भीवु नका आम्ही तुमच्या सोबत आहो हा संदेश दिला.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना व्हायरस पॉझिटिव्हचा एकही रुग्ण नसला तरी सर्व नागरिकाने दक्षता पाळणे आवश्यक आहे.त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की कोरोना या महाभयंकर साथीचा प्रादुर्भाव वाढू नये व पोलिसांनी मास्क चा वापर नियमित करावा व सोशीयल डिस्टेन्सचे नियम पाळून जनतेला सुद्धा त्यांनी आपल्या घरीच रहा बाहेर निघू नका आम्ही आपल्या सुरक्षेसाठी आहो असा संदेश रूट मार्चच्या निमित्त्याने दिला.

हा रूट मार्च उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व भद्रावती पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनील सिंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा, पोलीस उपनिरक्षक जितेंद्र ठाकूर, उपनिरीक्षक अमोल तुळजेवार, तसेच उपनिरीक्षक प्रियंका चौधरी आणि संपूर्ण पोलीस कर्मचारी यांनी मिळून जुने पोलीस स्टेशनच्या आवारात काढण्यात आला,

उपविभागिय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांनी आपल्या पोलीस दलाला कोरोना या साथीच्या होणारे संक्रमन व आत्मरक्षाबदल उपाययोजना याबद्दल माहिती सांगीतली
व समस्त जनतेला घरी रहा, सुरक्षीत रहा (हम अंदर तो, कोरोना बाहर) असे आवाहन केले, त्यावेळी उपस्थित वरोरा येथील डॉ मेहरदिप हटवार यांचे सोजन्याने पोलीस कर्मचाऱ्याना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची होमीओपाथीक औषध निःशुल्क वितरित केली, हा पोलीस रूट मार्च हा जुने पोलीस स्टेशन मधुन ते विट्ठल मंदिर, भोजवार्ड, आंबेडकर चौक येथुन वापस नविन पोलीस स्टेशन मध्ये पोहचला. पोलिसांच्या या रूट मार्चमुळे भद्रावतीकर जणू सुखावले असे चित्र दिसत होते.

Previous articleब्रेकिंग न्यूज :-मनपाच्या निधीतून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची भोजन वाटपातून चमकोगिरी ?
Next articleमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे भद्रावती तहसिलदारांना निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here