Home वरोरा सुयश;- सेन्ट अॅनिस हायस्कूल येथील स्पंदन बोरकर या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड...

सुयश;- सेन्ट अॅनिस हायस्कूल येथील स्पंदन बोरकर या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड !

घवघवीत यशाबद्दल जेष्ठ पत्रकार गांधी बोरकर यांचे पुत्र स्पंदन याचे सर्वत्र अभिनंदन.

वरोरा प्रतिनिधी : –

वरोरा येथील जेष्ठ पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले गांधी बोरकर यांचे सुपुत्र स्पंदन गांधी बोरकर याची केंद्रीय नवोदय समिती, नवी दिल्ली मार्फत जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत निवड करण्यात आल्याने सर्वत्र त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. वरोरा येथील सेन्ट अॅनिस हायस्कूल येथे शिकणारा इयत्ता पाचवी चा विद्यार्थी स्पंदन शालिनी गांधी बोरकर यांची तळोधी ( बाळापूर ) येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी साठी निवड झालेली आहे.
स्पंदनच्या घवघवीत यशाबद्दल सेन्ट अॅनिस चे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद , मित्र परिवार तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे. स्पंदन ने त्याच्या यशाचे श्रेय आजी अनुसयाबाई मानिक वाघमारे, मार्गदर्शक आलमवार मॅडम, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि आई-वडिलांना दिले आहे.

Previous articleधक्कादायक :- वर्धा पॉवर कंपनीत वाळू बिरिया या कामगाराचा आकस्मिक मृत्यू, कामगारांच्या मृत्यूचे गूढ मात्र कायम !
Next articleधक्कादायक :- अखेर चंद्रपूर जिल्हयातील कोरोना बाधितांची संख्या पोहचली शंभराच्या वर !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here