Home महाराष्ट्र खळबळजनक :- एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली

खळबळजनक :- एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली

नैराश्याच्या गर्तेत अडकलेले तरुण निघाले आत्महत्या करायला?

लक्षवेधक :-

स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं केंद्र बनलेलं पुणे शनिवारी हादरलं! पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहिलं, ज्यात त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत.

हळू हळू जग निराशेच्या गर्द सावलीत वावरायला लागलयं, कधी कुणाचा मृत्यूसाठी नंबर लागेल हे आता अनिश्चित झालय. त्यातही एकापाठोपाठ एक नैसर्गिक संकट आणि जगण्यासाठीचा माणसाचा संघर्ष, सर्व बिनर्थक वाटायला लागलय. करोनासारखी महामारी, सततचे लॉकडाऊन, वित्तसंकट आणि लोकांचे बिकट परिस्थितीला रोज द्यावे लागणारे तोंड त्यामुळे मनुष्य खचत जातोय.

भारतात नैराश्य, तनाव, चिंता एकटेपणातून आत्महत्या करणाऱ्यांचा आकडा फार मोठ्या प्रमाणात वाढत जातोय. ही संख्या खूप मोठी असून विचार करायला लावणारी आहे. प्रश्न हा आहे की, त्या सर्व आत्महत्या आपल्याला रोखता येतील का?

भारतात नैराश्यातून दर तासाला 72 एवढी आत्महत्या होते हा आकडा आश्चर्यचकित करणारा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मागे सादर केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतात नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांचा आकडा प्रचंड मोठा आहे.

या अहवालात त्यांनी म्हटले आहे की भारतात चाळीस सेकंदाला 1.5 म्हणजेच सरासरी दोन आत्महत्या या नैराश्यातून होतात. आज 15 ते 29 वयोगटातील तरुण आत्महत्या करायला निघालाय, ज्याप्रकारे भारताला तरुणांचा देश म्हटलं जातं त्यावरून असे तर नाही ना! कि देशाचं आत्महत्या करायला निघालाय.

तरुणांच्या वाढत्या नैराश्याला जबाबदार कोण?

हा प्रश्न जर तुम्ही बाहेर देशात विचारला तर, याचे उत्तर वेगळे असेल. तुम्हाला त्या देशात देशाची व्यवस्था हे उत्तर मिळेल. कारण तरुण हा त्या देशाचा स्तंभ असतो आणि स्तंभच ढासळले तर देशाचं काय होईल. प्रश्न हा सुद्धा आहे की राज्य अथवा देश आपल्या तरुणांच्या विकासासाठी काय करतोय?

महाराष्ट्रात दर 16 व्या मिनिटाला एक तरुण नैराश्यातून आत्महत्या करतो. त्याचे कुठेतरी एक कारण महाराष्ट्र सरकारने 2017-18 नंतर मुबलक प्रमाणात तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही. महाराष्ट्र शासनाची अशी कोणतीच योजना नाही की, जी तरुणांना रोजगार प्राप्त करून देईल. त्यामुळेचा तर उच्चशिक्षित तरुण स्पर्धा परीक्षाकडे पळत सुटतो आणि त्यातून आलेल्या नैराश्येनंतर आत्महत्या करून घेतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here