Home वरोरा सालोंरी गावाच्या आमसभेत घरकुल प्रश्नासोबतच इतर ज्वलंत प्रश्न समाविष्ठ करा.

सालोंरी गावाच्या आमसभेत घरकुल प्रश्नासोबतच इतर ज्वलंत प्रश्न समाविष्ठ करा.

गावकऱ्यांची संवर्ग विकास अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी, सालोरी गावाची आमसभा वादळी होणार ?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत मधील एक असलेली सालोरी ग्रामपंचायत सध्या मोठ्या वादात सापडली असून गावातील समस्या व प्रश्न सोडविण्यास ग्रामपंचायत सरपंच व इतर सदस्य कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. विमुक्त भटक्या जमाती असलेल्या समाजाला घरकुल योजनेचा लाभ देण्याचे सरकारचे धोरण असले तरी ज्या नागरिकांना घरकुल आवश्यक आहे त्यानां जाणीवपूर्वक डावलून ज्याना चांगली घरे आहे त्यांचेच नाव घरकुल यादीत असल्याने गावकऱ्यांमधे मोठा संताप व्यक्त होतं आहे. त्यामुळे स्थानिक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उचलून ज्यांना घरकुलाची आवश्यकता आहे त्यांनाच घरे द्या व जुनी बोगस यादी रद्द करा ही मागणी संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे लावून धरली, दरम्यान ही बाब ग्रामपंचायत च्या आमसभेत ठरल्या जावी म्हणून सरपंच आणि सदस्यांनी गावाची आमसभा घ्यावी अशी मागणी केल्यानंतर ती आमसभा आता उद्या दिनांक ३० सप्टेंबरला होईल असे जाहीर झाले मात्र त्या आमसभेत जे विषय चर्चिल्या जाणार आहे त्यात केवळ घरकुल चा विषयच घेतला असल्याने बाकी विषयाचे काय ? हा प्रश्न उपस्थित झाल्याने मनसे कार्यकर्ते रंगनाथ पवार यांच्या नेत्रुत्वात संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन गावातील ज्वलंत विषय सुद्धा चर्चिला जावे यासाठी काही विषय त्या आमसभेच्या विषय सूचित समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान संवर्ग विकास अधिकारी यांनी या संदर्भात स्पष्ट असे निर्देश स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला दिले नसल्याने मनसे च्या कुलदीप श्रिरामे यांच्या नेत्रुत्वात जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कुलदिप श्रिरामे, रामा वाघ, रंगनाथ पवार, दिगाबर मगरे, सुमित मोरे,व ईतर म.न.शे.कार्यकर्ते उपस्थित होते.

सालोरी गावातील अनेक विकास कामात मोठा भ्रष्टाचार झाला व गावातील रस्ते नाल्या सह आरोग्याची समस्या आ वासून उभी आहे मात्र सरपंच याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येत्या ३० सप्टेंबरला होणाऱ्या आमसभेत वेळेवर येणाऱ्या विषय सूचित मधे गावातील विविध ज्वलंत विषय समाविष्ट करण्याचे संवर्ग विकास अधिकारी यांनी मान्य केल्याची माहिती आहे. त्यामुळे गावकरी आता उद्याच्या आमसभेत ग्रामपंचायत चा जमा खर्च मागतील व त्यामुळे कुठे कुठे कोणती कामे झाली हे समोर येणार असल्याने उद्याची सभा वादळी होण्याची चिन्हे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here